#CWC19 : मॉर्गनची तूफानी शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 398 धावांचे लक्ष्य

मॅंचेस्टर – कर्णधार इऑन मॉर्गनची तुफानी शतकी खेळी तर जॉनी बेयर्सटो आणि जो रूट यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 397 धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा सलामीवीर जेम्स विन्स 26 धावांवर झटपट बाद झाला. त्यानंतर जॉनी बेयर्सटो आणि जो रूट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. जॉनी बेयर्सटोने 99 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 90 धावा केल्या, त्याला गुल्बदिन नाएबने झेलबाद केले. त्यानंतर इऑन मॉर्गन आणि जो रूट यांनी इंग्लंड संघाची कमान हाती घेत तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या (350) पार नेली. 46.4 व्या षटकांत जो रूटला बाद करत गुल्बदिन नाएबने ही जोडी फोडली. जो रूटने 82 चेंडूत 88 धावा केल्या.

त्यानंतर काही क्षणातच इऑन मॉर्गनही तंबूत परतला, त्याला बाद करत गुल्बदिन याने तिसरी विकेट घेतली. इऑन मॉर्गनने तूफानी खेळ करत 71 चेंडूत 17 षटकार आणि 4 चौकारासह 148 धावांची खेळी केली. तर मोईल अली याने 9 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 31 धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत गुल्बदिन नाएब आणि दौलत जादरान यांनी प्रत्येकी 3 विकेटस घेतल्या. अनुभवी गोलंदाज राशिद खान यांच्या गोलंदाजीची इंग्लंडच्या फलंदाजानी चांगलीच धुलाई केली. राशिद खान याने 9 षटकात 110 धावा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.