#IPL : इंग्लंडचे खेळाडूही आयपीएल खेळणार

लंडन – अमिरातीत यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने होणार असून, त्यातील संघांना इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने दिलासा दिला आहे. त्यांचे जे खेळाडू आयपीएलच्या विविध संघांशी करारबद्ध आहेत, त्यांना स्पर्धेत खेळण्याची परवानगी मंडळाने दिली आहे.

या निर्णयाचा सर्वांत जास्त लाभ महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला होणार आहे. त्यांच्या संघात इंग्लंडचे सर्वाधिक खेळाडू आहेत.

यंदाच्या आयपीएलस्पर्धेत काही संघांच्या खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

या स्पर्धेतील उरलेले 31 सामने अमिरातीत येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. या फेरीची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.