लंडन – आजपर्यंत अजिंक्यपदाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. दोन्ही संघाकडे स्वत:ची अशी बलस्थाने आहेत. त्या बलस्थानाच्या जोरावर दोन्ही संघाचा आजच्या सामन्यात विजय मिळवून विश्वविजेता होण्याचा प्रयत्न असेल. आज दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला तरी क्रिकेट क्षेत्रास नवा विश्वविजेता मिळणार आहे.
इंग्लंड बलस्थाने
-घरच्या मैदानावर व वातावरणात खेळण्याचा लाभ
-घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा
-अंतिम फेरीचा जास्त अनुभव (1979, 1987 व 1992 मध्ये उपविजेतेपद
-जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स यांचा सातत्यपूर्ण खेळ
-पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय
-जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स व मार्क वुड यांचा प्रभावी मारा
-साखळी गटात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय
कच्चे दुवे
-अंतिम फेरीत खेळताना मानसिक दडपण
-मधल्या फळीत सातत्यपूर्ण खेळाचा अभाव
-फिरकी माऱ्यापुढे खेळताना मर्यादा
-क्षेत्ररक्षणात होणाऱ्या अक्षम्य चुका
न्यूझीलंड बलस्थाने
-माजी विजेत्या भारतावर शानदार विजय
-केन विल्यमसन व रॉस टेलर यांची सातत्यपूर्ण फलंदाजी
-ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री यांची प्रभावी फलंदाजी
-उपांत्य फेरीत सामन्यास कलाटणी देणारे क्षेत्ररक्षण
कच्चे दुवे-
-साखळी लढतीमधील पराभवाचे अजूनही दडपण
-अंतिम सामना खेळताना येणाऱ्या अडचणी
-इंग्लंडच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याबाबतची चिंता
-मधल्या फळीत सातत्याचा अभाव