लीड्स : अँजेलो मॅथ्यूज याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 233 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 232 धावा केल्या आहेत. अँजेलो मॅथ्यूजने 115 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारांसह 85 धावा केल्या.
#CWC19 Sri Lanka finish at 232-9 in their 50 overs. England need 233 runs to win. #ENGvSL. pic.twitter.com/MCpGRf7nO1
— ANI (@ANI) June 21, 2019
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने टाॅस जिकूंन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. सलामीवीर दिमुथ करूणारत्ने 1 आणि कुसल परेरा 2 धावांवर तंबूत परतले. त्यानंतर अविष्का फर्नांडोने 49, कुसल मेंडिस 46 आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 85 धावा करत श्रीलंकेचा डाव सावरला. धनंजया डी सिल्वाने 29 धावा केल्या.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर आदिल राशिदने 2 आणि क्रिस वोक्सने 1 गडी बाद केला.