#CWC19 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

लंडन – ठणठणीत खेळपट्टीवरच इंग्लंडचे खेळाडू मर्दुमकी गाजवितात व अन्य मैदानांवर त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी होत नाही हा दावा खोडून काढण्यासाठी त्यांना आज येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. या दोन संघांमधील सामना ऍशेस मालिकेतील लढतीसारखाच चुरशीने खेळला जाईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड विरूध्द ऑस्ट्रेलिया हा सामना काही वेळातच लंडन येथील लाॅर्डस मैदानावर सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलिया संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

ऑस्ट्रेलिया –

ऐरन फ़िंच, डेविड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरनडोर्फ़, नाथन लायन

इंग्लंड –

जॉनी बेयर्सटो, जेम्स विन्स, जो रूट, इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, आदिल राशिद, जोफ़्रा आर्चर, मार्क वुड

Leave A Reply

Your email address will not be published.