पाच जणांना पोलीस कोठडी
तळेगाव दाभाडे – छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात परत आणावी यासाठी कोल्हापूर येथील पाच तरुणांनी गहुंजे स्टेडियमवर भगवा झेंडा रोवत “इंग्लंड टीम गो बॅक’ अशा घोषणादेखील दिल्या. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच मैदानावर पुढील दोन आठवड्यात भारत विरुद्ध इंग्लंड असा क्रिकेट सामना होणार आहे.
हर्शल अशोक सुर्वे (वय 42, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), प्रदीप पांडुरंग हांडे (सातार्डे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), विजय सुभाष दरवान (वय 47, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), देवेंद्र नंदकुमार सावंत (वय 30, रा. ताराराणी विद्यापीठाजवळ, टाकाळा चौक, राजारामपुरी, कोल्हापूर), आशिष चंद्रशेखर आष्टेकर (वय 31, रा. महाद्वार रोड, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे अटक करण्यात गहुंजे स्टेडियमवर “इंग्लंड गो बॅक’
आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत स्टेडियमवरील सुरक्षा रक्षक दीपक मुंडे (वय 28) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर आले. स्टेडियममध्ये जबरदस्तीने जाऊन भगवे झेंडे स्टेडियमच्या मैदानात रोवले आणि तेथेच बसले. आरोपींनी “इंग्लंड टीम गो बॅक’ अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या.
याच मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड असे 23, 26 आणि 28 मार्च रोजी एकदिवसीय क्रिकेट सामने होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मैदानाची सफाई सुरू असताना तरुण स्टेडियममध्ये घुसले आणि झेंडा रोवत घोषणाबाजी सुरु केली. हा प्रकार पाहून मैदानातील स्टाफ घाबरून पळून गेला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता मोहिते तपास करीत आहेत.
…म्हणून दर्शविला विरोध
1875-76 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अल्पवयीन असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स हा भारत भेटीवर आला होता. या प्रिन्सला जबरदस्तीची भेट म्हणून जगदंबा तलवार देण्यात आली. ती तलवार भारतात परत यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.