एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडचे वर्चस्व

बुधवारी भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळविला जात आहे. एकट्या एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड संघाने तब्बल 50 कसोटी सामने खेळले आहेत. भारताविरुद्धची ही कसोटी एजबॅस्टनवरील 51वी कसोटी ठरेल.

इंग्लंडने एजबॅस्टन मैदानावर पहिला कसोटी क्रिकेट सामंना मे 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तब्बल 116 वर्षांनी या ऐतिहासिक मैदानावर 51वा कसोटी सामना होत आहे. या मैदानावरील 50 पैकी 27 कसोटी सामने इंग्लंडने जिंकले असून केवळ 8 सामन्यांत पराभव पत्करला आहे., तर 15 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)