गैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक

लंडन – अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह चॅट केल्याप्रकरणी इंग्लंडच्या स्थानिक स्पर्धांमधील एका क्रिकेटपटूला पोलिसांनी सामना सुरू असतानाच भर मैदानातूनच अटक केली आहे.

डेव्हिड हाइमर्स असे या क्रिकेटपटूचे नाव असून तो एक क्‍लब क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. डेव्हिडनने अल्पवयीन मुलींना अश्‍लील संदेश पाठवल्याचे सिद्ध झाले असून तो शाळकरी मुलींना असे संदेश पाठवत होता.

त्याची तक्रारही काही मुलींच्या पालकांनी केली होती. त्यावरूनच पोलिसांनी डेव्हिडला अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.