#CWC19 : माझ्या खेळीबाबत मलाच आश्‍चर्य वाटते- मॉर्गन

मॅंचेस्टर – अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्यात मी खेळू शकेन की नाही याची मला खात्री नव्हती. तथापि या सामन्यात मी भाग घेतला. मी सतर षटकार मारू शकलो याच्यावर मला अजूनही विश्‍वास बसत नाही असे इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने सांगितले.

मॉर्गन याने या लढतीत सतरा षटकार ठोकतानाच अनेक्‍ब्बिक्रम मोडीत काढले. तसेच इंग्लंडच्या संघाकडून काही विक्रमही मोडले गेले. मॉर्गन याने मांगितले की, स्नायूंच्या वेदनेमुळे या सामन्यातील माझा सहभाग अनिश्‍चित होता, सामन्याचे दिवशी सकाळी आमच्या फिजिओंनी माझी तपासणी केली व मला या लढतीत सहभागी होण्यास परवानगी दिली. जरी आमच्यासाठी हा सामना म्हणजे सोपा पेपर होता तरी अफगाणिस्तानचे फलंदाज केव्हांही सामना फिरवू शकतात याची मला कल्पना होती. त्यामुळेच मी हा सामना खेळलो. या लढतीत मी 17 षटकार मारले यावर माझा विश्‍वासच बसत नाही.

सुदैवाने मला सूर सापडला व मी खेळतच राहिलो. माझ्यासाठी वैयक्तिक सांख्यिकी आकडेवारी फारशी महत्वाची नाही. संघास किमान 350 धावांपलीकडे नेणे प्राधान्याची गोष्ट होती. मी जरी आक्रमक शतक ठोकले तरी माझ्या अन्य सहकाऱ्यांच्या दृष्टीने मी खूप हळू खेळलो. मी जेव्हा फलंदाजीस आलो, त्यावेळी दोन्ही संघांना जिंकण्याची संधी होती. त्यावेळी आपण काहीतरी केले पाहिजे, असे मला वाटू लागले. मी खेळत राहिलो. चौकार व षटकार बसत गेले. खेळपट्टी फलंदाजीस अनुकुल होती. त्याचा आम्हाला विशेषत: मला जास्त फायदा झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.