बर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. दरम्यान, माझे लक्ष्य हे विराट कोहलीच्या विकेटचेच आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा गोलंदाज मोईन अली याने दिली आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, कोहली हा भारतीय संघाचा फलंदाजीचा मोठा आधारस्तंभ आहे. त्याला झटपट बाद करण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. 19 वर्षाखालील गटाच्या स्पर्धेपासून मला त्याच्या गुणदोषांचा सखोल अभ्यास आहे. आयपीएल स्पर्धेत खेळताना मी नेहमीच त्याच्या खेळाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. त्याला लवकर बाद केले तर आमचे काम सोपे होणार आहे. कोहली हा नेहमीच आक्रमक व आश्वासक फलंदाजी करीत असतो.