इंग्लंडचा आयर्लंडवर 143 धावांनी विजय

लंडन – विश्‍वविजेत्या इंग्लंडला पहिल्या डावात 85 धावांत गुंडाळणाऱ्या आयर्लंडला त्याचा मानसिक फायदा घेता आला नाही. त्यांचा दुसरा डाव केवळ 38 धावांत गुंडाळून इंग्लंडने एकमात्र क्रिकेट कसोटी सामन्यात 143 धावांनी विजय मिळविला.

विजयासाठी आयर्लंडपुढे 182 धावांचे सोपे आव्हान होते. तथापि ख्रिस व्होक्‍स व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव 15.4 षटकांत 38 धावांत कोसळला. व्होक्‍सने 17 धावांमध्ये 6 गडी बाद केले तर ब्रॉडने 19 धावांमध्ये 4 विकेट्‌स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव 85 व दुसरा डाव 77.5 षटकांत 303 (जॅक लीच 92, जेसन रॉय 72, स्टुअर्ट थॉमसन 3-44, मार्क अडेर 3-66)
आयर्लंड पहिला डाव 207 व दुसरा डाव 15.4 षटकांत 38 (ख्रिस व्होक्‍स 6-17, स्टुअर्ट ब्रॉड 4-19)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)