#CWC19 : रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ; भारताचा 31 धावांनी पराभव

बर्मिंगहॅम – फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत विश्‍वचषक स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. दरम्यान भारताकडून रोहित शर्माने केलेली 102 धावांची शतकी खेळी या पराभवाने व्यर्थ ठरली. तर, भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे विश्‍वचषकातील आव्हान डळमळीत झाले आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांत 7 बाद 337 धावांची मजल मारत भारतासमोर विजयासाठी 338 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना भारताला निर्धारित 50 षटकांत 5 बाद 306 धावांचीच मजल मारता आल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल एकही धाव नकरता परतल्याने भारताला 8 धावांवर पहिला धक्‍का बसला. यानंतर आलेल्या विराट कोहलीला हाताशी घेत रोहित शर्माने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यावेळी दोघांनीही सावध खेळी करत भागिदारी वाढवण्यावर आपला भर दिल्याने भारताची धावगती खालावली होती.

त्यामुळे भारताला 10 षटकांमध्ये केवल 28 धावाच करता आल्या होत्या. तर, 13.5 षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लागले होते. यानंतर कोहलीने आक्रमक रूप धारन करत संघाचा डाव सावरायला सुरूवात करत 59 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. हे कोहलीचे लागोपाठ पाचवे अर्धशतक ठरले. कोहलीच्या अर्धशतकानंतर इतकावेळ सावध फलंदाजी करणाऱ्या रोहितनेही फटकेबाजीला सुरूवात करत भारताला 22 षटकांत शतकी मजल ओलांडून देत 65 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

भारतीय संघाच्या शतकानंतर विराट आणि रोहितने फटकेबाजीला सुरूवात करत धावांचा वेग वाढवायला सुरूवात केली. मात्र, 66 धावांवर खेळनाऱ्या विराटला बाद करत प्लंकेटने इंग्लंडला महत्वपूर्ण बळी मिळवून दिला. विराट बाद झाल्यानंतर रोहितने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत ऋषभ पंतच्या साथीत रनरेट वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहितने आपले या विश्‍वचषकामधील तिसरे शतक पूर्ण केले. शतकानंतर लागलीच वोक्‍सने त्याला 102 धावांवर बाद केले. त्यानंतर सेट झालेला ऋषभ पंत आणि नुकताच आलेला हर्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी सुरु केली. मात्र 32 धावाकरुन पंत परतल्याने ही जोडी फुटली.

पंत बाद झाल्यानंतर धोनीला हाती घेत पांड्याने फटकेबाजी करायला सुरूवात केली. मात्र, 45 धावांवर खेळणाऱ्या पांड्याला बाद करत प्लंकेटने भारताला पाचवा धक्‍का दिल्याने भारताच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आली. यानंतर आलेल्या केदार जाधव आणि धोनीने अखेरच्या षतकांमध्ये फतकेबाजी करत भारताला 50 षटकांत 5 बाद 306 धावांची मजल मारुन दिली. यावेळी धोनीने नाबाद 42 धावांची खेळी केली. तर, इंग्लंडतर्फे प्लंकेटने तीन गडी बाद करत 55 धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.