#CWC19 : इंग्लंडचा अफगाणिस्तानवर 150 धावांनी विजय

मॅंचेस्टर – विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या इंग्लंडचा विजय ही काळ्या दगडावरची रेष होती. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी कौतुकास्पद लढून सामन्यात थोडी रंगत आणली. त्यांनी 50 षटकात 8 बाद 247 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना 150 धावांनी जिंकून उपांत्य फेरीसाठी आव्हान राखले.

गुलाबदीन नईब (37) व रहमत शाह (46) यांनी पहिल्या फळीत चांगली झुंज दिली. हशमतुल्लाह शाहिदी व असगर अफगाण यांनी सहजसुंदर फटकेबाजी केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच त्यांना दोनशे धावांपलीकडे पोहोचता आले. असगर याने 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या. शाहिदी याने 5 चौकार व 2 षटकारासह 76 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद व जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अफगाणिस्तानने 50 षटके खेळून काढली हीच त्यांच्यासाठी मोठी कामगिरी होती.

मॉर्गन याने वेगवान शतक टोलवून फक्‍त 71 चेडूंमध्ये 148 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीबदल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

जॉनी बेअरस्टो (90) व जो रूट (88) यांच्या साथीत त्याने शतकी भागीदारी रचल्या. बेअरस्टो याला शतकापूर्वीच तंबूचा रस्ता पकडावा लागला. त्याने 8 चौकार व 3 षटकारांसह 90 धावा केल्या. रूट याने 5 चौकार व एक षटकारासह 88 धावा केल्या. मोईन अली यानेही हात धुवून घेतला. त्याने चार षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड : 50 षटकात 6 बाद 397 (जॉनी बेअरस्टो 90, जो रूट 88, इऑन मॉर्गन 148, मोईन अली नाबाद 31, दौलत झारदान 3-95, गुलाबदीन नईब 3-68) अफगाणिस्तान : 50 षटकात 8 बाद 247 (गुलाबदीन नईब 37, रहमत शाह 46, असगर अफगाण 44, जोफ्रा आर्चर 3-52, मार्क वुड 2-40, आदिल रशीद 3-66)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.