विश्वविजेत्या इंग्लंडचे आयर्लंडपुढे लोटागंण; कसोटीत 85 धावात ऑलआऊट

लंडन : नुकत्याच झालेल्या विश्वचषक2019 स्पर्धेत क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता. त्याच मैदानावर इंग्लंडला अत्यंत नामुष्कीचा सामना करावा लागलाय.

आजपासून इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी आयर्लंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव केवळ 85 धावात संपुष्ठात आला. अॅशेस मालिकेपूर्वीच्या या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडची ही अवस्था झाली आहे.

ज्यो रुटच्या नेतृत्वाखालील या संघातील केवळ तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली आहे. यामध्ये जो. डोनली याने 23, सॅम करण 18 तर ओली स्टोनने 19 धावा केल्या. तर रॉरी बर्न्स 6, कर्णधार ज्यो रूट 2, तर बेयरस्टो, वोक्स आणि मोईन अली शून्यावर बाद झाले.

आयर्लंडकडून टीम मुर्तघने सर्वाधिक 5 गडी बाद केले. टीम मुर्तघने 9 षटकात 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडरने 3 आणि बॉईड रँकिनने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

दरम्यान, सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पहिल्याच कसोटीत आयर्लंडने विश्वविजेत्या संघाला 85 धावात बाद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)