‘सिंगल युज प्लॅस्टिक’ विरुद्ध अभियंते रस्त्यावर

पिंपरी – आळंदी येथील अभियंत्यांच्या “व्हिजनरी फाइटर्स’ या ग्रुपने सिंगल युज प्लॅस्टिक विरुद्ध लढण्यासाठी नव्या ट्रेंडची सुरुवात केली आहे. यामध्ये संपूर्ण शहर “सिंगल युज प्लॅस्टिक’ मुक्‍त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शहरातील विविध भागातील 50 हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

फिटनेस आणि स्वच्छता मोहिमेला हातभार लावणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या “मन की बात’ मध्ये उल्लेख केलेला ट्रेंडिंग उपक्रम, शहरातील पर्यावरणवाद्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या ग्रुपने शहरातील मुख्य भागांवर जोरदारपणे धाव घेतली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी हा उपक्रम राबविला जात आहे. शहर परिवहन पीएमपीएमएल बसेसमधील सिंगल युज प्लॅस्टिक विषयी जागरूकता सत्रांद्वारे ही मोहीम सुरू ठेवली.

स्वयंसेवकांनी प्लॅस्टिकचा वापर थांबविण्यासाठी कचरा व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 50 बसेसची स्वच्छता केली. पुण्यात नुकत्याच झालेल्या पुराचा अभ्यास केल्यानंतर अभियंत्यांनी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या नाल्यांचे निरीक्षण केले. या मोहिमेव्दारे नागरिकांना प्लॅस्टिकच्या धोक्‍याविरोधात लढा देण्यासाठी सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

“व्हिजनरी फाइटर’ चे स्वयंसेवक गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नद्यांची साफसफाई करीत आहोत. मुख्य नदी प्रदूषणाचा उगम म्हणजे प्लॅस्टिक जे रस्त्यावरच आढळते. यासाठी रस्त्यावर प्लॅस्टिक टाकणे थांबविणे आणि त्यानुसार घरगुती कचरा व्यवस्थापित करणे आवश्‍यक आहे. यासाठी जनजागृती केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)