अभियंत्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अधिक संधी – डॉ. कॅस्टिलो

पिंपरी – आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध होत असून “फजी’ सिस्टिमला चांगली मागणी आहे. तांत्रिक विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करण्यासाठी या क्षेत्राचा विचार करावा, असे प्रतिपादन अमेरिकेतील तिजुआना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजिचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ऑस्कर कॅस्टिलो यांनी केले.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे “कॉम्यूटींग, कम्यूनिकेशन कंट्रोल ऍण्ड टोमेशन’ या विषयावरील तीन दिवसांच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन यूएसए येथील तिजुआना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजिचे अधिष्ठाता डॉ. ऑस्कर कॅस्टिलो यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पर्सिस्टन्ट सिस्टिमचे उपाध्यक्ष डॉ. आर. व्यंकटेश्‍वरन, आयईईईचे प्रा. गिरीश खिल्लारी, प्रा. मंदार खुर्जेकर, टीसीएसचे मंदार भाटवडेकर, जगदीश चौधरी, पीसीईटीचे विश्‍वस्त भाईजान काझी, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा. डॉ. के. राजेश्‍वरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी, बोलताना प्रा. ऑस्कर कॅस्टिलो म्हणाले की, जागतिक स्तरावर अभियंत्यांना कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे चिकित्सकपणे पाहिले पाहिजे. या क्षेत्रामध्ये नवअभियंत्यांना उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये “फजी’ लॉजिकल सिस्टिम कॅमेरा अन्य इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे, या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अधिक संधी असल्याचे ते म्हणाले.

पर्सिस्टंट टेक्‍नोलॉजीचे आर. व्यंकटेश्‍वरन्‌ यांनी “टेक्‍नोलॉजी ट्रेंडस्‌’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टीसीएसचे मंदार भाटवडेकर यांनी आजचा युवक नोकरी मागत नसून स्वयंरोजगाराच्या नवीन संधी शोधत आहे, विद्यार्थ्यांनी काळाच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. फुलंबरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, “आयसीक्‍युब – 2019′ आंतरराष्ट्रीय परिषदेचे विषयी माहिती सांगतली. पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 200 शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत असे डॉ. फुलंबरकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. दीपा आबीन यांनी केले तर आभार प्रा. डॉ. लिना शर्मा यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.