पुणे – अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी राज्य सीईटी सेलने शनिवारी जाहीर केली. ही यादी राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी पदवी प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार यापूर्वीच विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली.
यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांना काही बदल अथवा दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांना दि. 3 ते 4 जानेवारी अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 6 जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि एमबीएही प्रवेशप्रक्रिया सुरू
आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्तायादी जाहीर झाली आहे. शनिवारी (ता. 2) हरकती नोंदविण्याची मुदत संपली आहे. अंतिम गुणवत्ता यादी 4 जानेवारीला, दि. 5 पासून पहिली फेरी राबविली जाणार आहे. तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या प्राथमिक यादीवर रविवारी सायंकाळी पाच पर्यंत हरकत नोंदविण्याची मुदत आहे. 6 जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर होईल, तर 7 जानेवारीपासून पहिली फेरी सुरू होणार आहे. “एमबीए’ची 7 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. 8 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे.