अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेश आजपासून

पुणे – अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला बुधवारपासून (दि.9) सुरू होत आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती “ट्विट’द्वारे दिली. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रकही राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होत आहे.

अभियांत्रिकी प्रवेश
अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी 9 ते 15 डिसेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर दि. 16 डिसेंबरपर्यंत अर्ज निश्‍चितीसाठी कालावधी आहे. दि. 18 डिसेंबर रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी, तर दि. 22 डिसेंबर रोजी अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यंदा प्रवेशाची दोन फेरी असून, पहिली फेरी 23 डिसेंबर, तर दुसरी फेरी 1 जानेवारी रोजी सुरू होत आहे. प्रवेशाचा कटऑफ 14 जानेवारीपर्यंत आहे.

फार्मसी पदवी प्रवेश
औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत अर्ज करावा लागेल. तसेच दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज निश्‍चिती करता येईल. प्राथमिक गुणवत्ता यादी 17 डिसेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी 21 डिसेंबर रोजी जाहीर होईल. पहिली फेरी 22 डिसेंबर रोजी, तर प्रवेशाची दुसरी फेरी 31 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

थेट द्वितीय वर्ष पदवी प्रवेश
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची प्रक्रिया 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत होत आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी दि. 17 डिसेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी 21 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. पहिली फेरी 22 डिसेंबर, तर दुसरी फेरी 31 डिसेंबरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.