दुचाकी घसरून पडल्याने अभियंत्याचा मृत्यू

पुणे – टेम्पोला ओव्हरटेक करीत असताना दुचाकी घसरून पडल्याने अभियंत्याचा टेम्पोच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. पिंगळेवस्तीकडून ताडीगुत्ता चौकाच्या दिशेने जात असताना जीम नेशनसमोर शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. सुशील महाराज पंडित (39, रा. केशवनगर), असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्याच्या मृत्यूूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक सुरेश मैराळे (चिखली, ता. हवेली) यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

सुशील पंडित हे शनिवार दि. 28 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पिंगळे चौकातून ताडीगुत्ता चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी जीम नेशन समोरील रोडवर टेम्पोच्या डाव्या बाजूने जात असताना पंडित यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर कोसळले. पंडिता हे टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंडित हे हिंजवडी फेज तीन येथील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)