रिमेक-सिक्‍वेलपटाच्या योजनेत व्यस्त

फरहान अख्तरचा “तुफान’ हा एक महत्त्वाचा चित्रपट जून महिन्यामध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे समजते. आता हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फरहानने पूर्णपणे नव्या टीमसोबत बनवलेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी यापूर्वी “भाग मिल्खा भाग’ या फरहान अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.

या चित्रपटात मृणाल ठाकूर ही नवोदित अभिनेत्री नायिका म्हणून झळकणार आहे. एकंदरीत चित्रपटात परेश रावल वगळता सर्वच स्टार कास्ट नवी असणार आहे. अंजुम राजबली यांनी लिहिलेल्या या चित्रपटात फरहान करण श्रीवास्तव या राष्ट्रीय पातळीवरील बॉक्‍सरची व्यक्‍तिरेखा साकारणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळाचा फरहान सदुपयोग करताना दिसत आहे. आपल्या एक्‍सेल या बॅनरचा विस्तार करण्याची योजना तो आखत आहे. त्याची बहीण झोयाने “गली बॉय’चा नायक रणबीर सिंहसोबत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिला “डॉन-3’मध्ये शाहरुखच्या जागी रणवीरला घ्यायचे आहे. त्यामुळे हा प्रोजक्‍ट काहीसा पुढे गेला आहे.

दिग्गज चित्रपटनिर्माते यश चोप्रा यांच्यासोबत साहाय्यक म्हणून काम केलेल्या फरहानला यशजींच्या “दिवार’ या चित्रपटाचा रिमेक बनवायचा आहे. सध्या फरहान यावरच काम करत असल्याचे समजते. अर्थात, या चित्रपटाचे हक्‍क त्रिमूर्ती फिल्मस्‌कडे आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा राजीव राय यांनी यापूर्वीच या चित्रपटाच्या रिमेकसाठी अनेकांना नकार दिला आहे. आता फरहान या अडचणीतून कसा मार्ग काढतो हे पाहायचे !

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.