ENG vs WI 2nd Test ( Joe Root) : जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडसाठी दमदार कामगिरी करत शतके झळकावली आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्याचा दुसरा सामना नॉटिंगहॅम येथे होत आहे. खरंतर, इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही पहिल्या डावात 457 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 425 धावा करत वेस्ट इंडिजला विजयासाठी 385 धावांचे लक्ष्य दिले आहे.
यादरम्यान दुसऱ्या डावात ब्रूकने 132 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. ब्रुकच्या या खेळीत 13 चौकारांचा समावेश होता. त्याच्यासह जो रूटने 178 चेंडूंचा सामना करत 122 धावा केल्या. रूटने 10 चौकार मारले. या सामन्यात रूटने शतक झळकावले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक आहे.
1. रूटने या आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत तो सक्रिय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूटने 48 शतके झळकावली आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 80 शतके झळकावली आहेत. रोहित शर्माही दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित आणि रूट संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहितने 48 शतके झळकावली आहेत. केन विल्यमसनने 45 शतके झळकावली आहेत. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2. रुट हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यामध्ये त्याने सर्वाधिक शतकेही ठोकली आहेत. यासोबतच दुहेरी शतकाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
3. जो रूटने या सामन्यात शतक झळकावले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक आहे. यासोबतच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकले आहे. रुटच्या आता कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजार 940 धावा झाल्या आहेत. तर चंद्रपॉलने 11 हजार 867 धावा केल्या आहेत. रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 8वा खेळाडू बनला आहे.