ENG vs AUS T20 Series 2024 : स्कॉटलंडविरूध्द 3-0 ने टी-20 मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला आहे. 11 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी फिल सॉल्टकडे नियमित कर्णधार जोस बटलरच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसह कर्णधार सॉल्ट याने पहिल्याच सामन्यात 3 खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कोण आहेत तीन नवीन खेळाडू ?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 11 सप्टेंबर रोजी साउथम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. यावेळी फिल सॉल्टच्या नेतृत्वाखाली जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स आणि जेमी ओव्हरटन हे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण करतील. कर्णधार फिल सॉल्ट विल जॅकसह सलामी देईल, तर नवोदित जॉर्डन कॉक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टन चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
कॉक्स व्यतिरिक्त, 20 वर्षांचा जेकब बेथेल देखील पदार्पण करणार आहे, त्याने द हंड्रेड आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. ही बाब लक्षात घेऊन व्यवस्थापनाने त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जेमी ओव्हरटन अष्टपैलूच्या भूमिकेत दिसणार असून सॅम करनला सपोर्ट करताना दिसणार आहे. आदिल रशीद संघात फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याच्याशिवाय रीस टोपली, जोफ्रा आर्चर आणि साकिब महमूद हे संघाचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज असतील.
We’ve named our XI to kick off our IT20 series with Australia 📝
Three debutants 🫡#ENGvAUS | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक, कर्णधार), विल जॅक, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंग्स्टन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपली.
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी संघ जाहीर…! जाणून घ्या काय झाले बदल…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड रिकाॅर्ड – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे एकमेकांचे मोठे प्रतिस्पर्धी मानले जातात. दोन्ही संघ मैदानात उतरताच जल्लोष वाढतो. खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी-20 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. दोघांनी आतापर्यंत 24 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळाली. दोघांनी 11-11 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. मात्र, घरच्या मैदानावर सामने जिंकण्यात इंग्लंडचा संघ पुढे आहे. इंग्लंडने घरच्या मैदानावर 7 टी-20 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 6 टी-20 सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहता या दोघांमध्ये पुन्हा एकदा तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे, असे म्हणता येईल.