England vs Australia T20 Series Live Streaming : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्ण तयारीत आहेत. भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर इंग्लंड संघाचा हा पहिलाच टी-20 सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान इंग्लंडसाठी सोपे नसेल. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली आणि या मालिकेपूर्वी ते जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.
इंग्लंडसाठी, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच टी-20 मालिका सुरू होत आहे, त्यामुळे अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे यजमान संघ नवीन खेळाडूंसह टी-20 मालिकेला सुरुवात करेल, ज्यांना त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाकेदार सुरूवात करायची आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघ 3 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतातील अनेक चाहत्यांना ही मालिका पहायची इच्छा आहे, म्हणून ही मालिका भारतात कधी, कुठे आणि कशी पाहता येईल ते जाणून घेऊया….
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेशी संबंधित संपूर्ण माहिती
1. उभय संघांमधील पहिला टी-20 सामना 11 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होईल.
2. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी- 20 सामना साउथहॅम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
3. भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे प्रसारण पाहता येणार आहे.
4. भारतीय चाहते सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20I सामना ऑनलाइन लाइव्ह पाहू शकतात.
Jordan Cox, Jacob Bethell and Jamie Overton will make their T20I debuts for England in the series opener against Australia tomorrow 🧢 #ENGvAUS pic.twitter.com/Sc6y9yHIvz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 10, 2024
टी-20 मालिका वेळापत्रक
पहिला सामना – 11 सप्टेंबर (रात्री 11 वा.)
दुसरा सामना – 13 सप्टेंबर (रात्री 11 वा.)
तिसरा सामना – 15 सप्टेंबर (रात्री 7. वा.)
टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघ खालीलप्रमाणे –
इंग्लंडचा टी-20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार/विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), सॅम करन, जोश हल, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद , रीस टाॅपले, जॉन टर्नर.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनी , ॲडम झाम्पा.