England vs Australia 3rd T20 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खराब हवामान आणि पावसामुळे रद्द करण्यात आला. रविवारी रात्री मँचेस्टरमध्ये बराच वेळ पाऊस सुरूच होता. अशा स्थितीत सामन्याचा नाणेफेकही(Toss) होऊ शकली नाही आणि एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यामुळे तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. अशा परिस्थितीत आता दोन्ही संघाना टी-20 संयुक्त विजेतेपद देण्यात आले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवला जाणार होता. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होता. मात्र, सततच्या पावसामुळे सामन्याचा टाॅसही(नाणेफेक) वेळेवर होऊ शकला नाही. त्यानंतर सुमारे दोन तास वाट पाहण्यात आली, पण पाऊस थांबला नाही. अशा परिस्थितीत हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्टच्या हाती होती. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता, पण पहिल्या टी-20 नंतर मार्शला दुखापत झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेडला कर्णधार बनवण्यात आले होते.
Match abandoned at Old Trafford means England and Australia share the T20 series 1-1 #ENGvAUS pic.twitter.com/qKwyzpav9x
— cricket.com.au (@cricketcomau) September 15, 2024
पहिला टी-20 : ऑस्ट्रेलिया 28 धावांनी विजयी…
टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून 179 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्रजांचा डाव अवघ्या 151 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने केवळ 23 चेंडूत 59 धावांची खेळी केली. गोलंदाजीत शॉन ॲबॉटने तीन आणि ॲडम झाम्पाने दोन गडी बाद करत महत्वपूर्ण योगदान दिले होते.
दुसरा टी-20 : इंग्लंडने तीन विकेट्स राखून मिळवला विजय
दुसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने गमावलेला सामना जवळपास जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून 20 षटकांत 193 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जॅक फ्रेझर मॅकगर्कने 31 चेंडूत 50 धावा, ट्रॅव्हिस हेडने 14 चेंडूत 31 धावा आणि जोश इंग्लिसने 26 चेंडूत 42 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या 34 धावांत दोन गडी गमावले होते. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लियाम विलिंगस्टोनने 47 चेंडूत 87 धावा आणि युवा जेकब बिथेलने 24 चेंडूत 44 धावा करत आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
IND vs BAN : बांगलादेशचा संघ भारतात दाखल, ‘या’ तारखेला चेन्नईत होणार पहिला कसोटी सामना…
आता एकदिवसीय मालिकेचा रणसंग्राम…
आता 19 सप्टेंबरपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला, दुसरा सामना 21 सप्टेंबरला, तिसरा सामना 24 सप्टेंबरला, चौथा सामना 27 सप्टेंबरला आणि पाचवा सामना 29 सप्टेंबरला होणार आहे.