Australia vs England 2nd T20I : – लियाम लिव्हिंगस्टोनने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ३ गडी राखून पराभूत करताना तीन टी-२० सामान्यांच्या लढतीमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू शॉर्ट भेदक गोलंदाजी करताना निम्मा संघ बाद केला, मात्र तो ऑस्ट्रेलियाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. यात जेक फ्रेझर-मॅकगर्कने ५० धावांची तर जोश इंग्लिसने ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर ट्रेव्हिस हेडने ३१ तर मॅथ्यू शॉर्टने २८ धावा करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. इंग्लंड संघाकडून ब्रिडोन कार्स व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी २ तर सॅम करण व आदिल रशीद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Standout performances from Matt Short and Jake Fraser-McGurk, but England level the series 1-1 in Cardiff.
More from @jackpayn at Sophia Gardens: https://t.co/yaA4fm30Ao pic.twitter.com/L6kvxlB1qK
— cricket.com.au (@cricketcomau) September 13, 2024
लियाम लिव्हिंगस्टोनच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने १९ षटकांत ७ बाद १९४ धावा करताना सहज विजय साकारला. लियाम लिव्हिंगस्टोनने ४७ चेंडूत ६ चौकार व ५ षटकार मारताना ८७ धावांची दमदार खेळी केली. त्याला जेकब बेथेल ४४ तर फील सॉल्ट ३९ धावा करताना सुरेख साथ दिली. मॅथ्यू शॉर्टने ३ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. शॉन ऍबॉटने २ गडी बाद केले.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारतीय फलंदाजी हे सर्वात मोठे आव्हान – नॅथन लायन
धावफलक –
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १९३ : जेक फ्रेझर-मॅकगर्क ५० (४ चौकार, २ षटकार, ३१ चेंडू), जोश इंग्लिस ४२ (५ चौकार, १ षटकार), ट्रेव्हिस हेड ३१ (४ चौकार, २ षटकार), मॅथ्यू शॉर्ट २८ (३ चौकार, १ षटकार) ब्रिडोन कार्स ४-०-२६-२, लियाम लिव्हिंगस्टोन ३-०-१६-२, सॅम करण ३-०-३७-१, आदिल रशीद ४-०-३५-१ इंग्लंड : १९ षटकांत ७ बाद १९४ : लियाम लिव्हिंगस्टोन ८७ (४७ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार), जेकब बेथेल ४४ (४ चौकार, ३ षटकार), फील सॉल्ट ३९ (२ चौकार, ३ षटकार), मॅथ्यू शॉर्ट ३-०-२२-५, शॉन ऍबॉट ४-०-३७-२