नवी दिल्ली – चीनच्या लोन अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. (ED freezes Rs 46.67 cr worth funds of Easebuzz, Razorpay, Paytm after recent raids) ईडीने पेटीएम, Easebuzz, Razorpay आणि कॅशफ्रीच्या बॅंक अकाऊंट आणि व्हर्चुअल अकाऊंटमधील 46.67 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. चायनीज लोन अॅप प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती.
ईडीने 14 सप्टेंबर रोजी बिहारमधील दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. याशिवाय एचपीझेड लोन अॅपवर नोंदवलेल्या मनी लॉंड्रिंग प्रकरणासंदर्भातही ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथील PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree या पेमेंट कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले.
Enforcement Directorate has detected and froze Rs 46.67 crore kept in various bank accounts and virtual accounts of Easebuzz, Razorpay, Cashfree, and Paytm after recent raids in Chinese loan app case: ED pic.twitter.com/83EZ5XhL1l
— ANI (@ANI) September 16, 2022
या कंपन्यांच्या व्हर्च्युअल अकाऊंटमध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आल्याचे ईडीच्या तपासादरम्यान समोर आले. ज्यात Easy Buzz Pvt Ltd (Pune) च्या अकाऊंटमध्ये 33.36 कोटी रुपये, Razorpay Software Pvt Ltd च्या अकाऊंटमध्ये 8.21 कोटी रुपये, Cashfree Payments India Pvt Ltd च्या अकाऊंटमध्ये 1.28 कोटी रुपये आणि पेटीएमच्या अकाऊंटमध्ये 1.11 कोटी रुपये सापडले आहेत.
ईडीने दिलेल्या निवेदनानुसार, या विविध बॅंक अकाऊंट आणि व्हर्च्युअल अकाउंटमधील सुमारे 46.67 कोटी रुपयांची रक्कम शोधून ती गोठवण्यात आली आहे. गतवर्षी नागालॅंड पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ईडी मनी लॉंड्रिंगची चौकशी करत आहे.