उर्जेची बचत म्हणजे उर्जेची निर्मिती – अगस्तमनी

पिंपरी (प्रतिनिधी) – उर्जेची बचत केली म्हणजे निर्मिती केल्यासारखेच आहे. यामुळे प्रत्येकाने विजेची बचत केली पाहिजे, असे मत सेंच्युरी एन्का कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. वाय. अगस्तमनी यांनी व्यक्‍त केले.

राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताह 2019 यानिमित्त भोसरी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी के. एल. लाडसरिया, मार्केटिंग विभागाचे सिनिअर व्हाईस प्रसिडन्ट मिलिंद अष्टपुत्रे, इंजिनिअरिंग विभागाचे सिनिअर व्हाईस प्रसिडन्ट यतीन कामत, उत्पादन विभागाचे सिनिअर व्हाईस प्रसिडन्ट राकेश बत्रा यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अगस्तमनी म्हणाले, उर्जेची बचत केल्यामुळे फक्‍त पैसे वाचतात असे नाही तर भविष्यातील पिढीसाठी चांगले पर्यावरण मिळणार आहे. यामुळे शक्‍य तेवढी उर्जेची बचत प्रत्येकाने करावी.”सेंच्युरी एन्का कंपनीत उर्जा व्यवस्थापक म्हणून काम करणारे दिगंबर परकाळे म्हणाले, “”उर्जेच्या बचतीचे महत्व तळागाळापर्यंत पोचावे हा राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताह 2019 चा उद्देश आहे. अशाप्रकारचा सप्ताह आम्ही पहिल्यांदाच कंपनीमध्ये साजरा करीत आहोत. कशाप्रकारे उर्जेची बचत करता येईल, याची माहिती या सप्ताहामध्ये दिली जाणार आहे.”यावेळी उपस्थित कामगार व अधिकाऱ्यांना दिगंबर परकाळे यांनी उर्जा बचतीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्‍विन आचरेकर यांनी केले. तर अमित शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.