महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा झाली आहे.. नितीन राऊत यांनी स्वत ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी आज पाॅझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो की, सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित रहावे आणि काळजी घ्यावी”.

नितिन राऊत हे नागपूरचे पालकमंत्री देखील आहेत. दरम्यान, नागपूरात काल( १७ सप्टेंबर 2020) १७१७ कोरोना रुगणांची भर पडली आहे तसेच ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.नागपुरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८,८९० झाली असून आतापर्यंत १८७९ जणांचे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ४५,३७२ झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.