Indigenous Warships | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १५ जानेवारी रोजी मुंबईतील नौसेना डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या तीन महत्त्वाच्या युद्धनौकांचे राष्ट्रर्पण करणार आहे. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौका भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
या युद्धनौकांच्या समवेशाने भारतीय नौदलाचे सामरिक सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. विशेष म्हणजे ते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहेत. स्वदेशी उत्पादनाचे हे उत्कृष्ट उदाहरण भारतीय संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीच्या समावेशाने भारतीय नौदलाची क्षमत कैकपटीने वाढणार आहे. त्याशिवाय हे स्वदेशी निर्मितीच एक उत्तम उदहारण सुद्धा आहे. दोन युद्धनौका आणि पाणबुडी मुंबईच्या माझगाव डॉकमधील शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये डिझाइन करुन बनवण्यात आल्या आहेत. यात आयएनएस सूरत ही स्टेल्थ गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. आयएनएस नीलगिरी प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. आयएनएस वाघशीर ही स्कॉर्पिन-क्लास सबमरीन आहे.
आयएनएस सूरत
INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B अंतर्गत तयार केलेले चौथे आणि शेवटचे स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र विनाशक आहे.आयएनएस सूरतच्या बांधणीची सुरुवात 7 नोव्हेंबर 2019 रोजी घातला गेला आणि 17 मे 2022 रोजी लॉन्च झाला. या युद्धनौकेत प्रगत रडार यंत्रणा आणि स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे ती शत्रूवर गुप्तपणे हल्ला करण्याची क्षमता देते. स्टलेथ फिचर्स आणि अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेली ही युद्धनौका आहे.
शत्रुला ही युद्धनौका सापडत नाही. हे 7,400 टन विस्थापनासह 164 मीटर लांब आहे आणि समुद्राखालील क्षेपणास्त्रांपासून टॉर्पेडोपर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. ही भारतीय नौदलाची आतापर्यंतची सर्वात वेगाने निर्मिती करण्यात आलेली स्वदेशी डिस्ट्रॉयर आहे. त्याच्या ‘कम्बाइंड गॅस अँड गॅस’ (COGAG) प्रणोदन प्रणालीसह, जहाज 30 knots (56 km/h) वेगाने धावू शकते.
आयएनएस नीलगिरी
आयएनएस नीलगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही युद्धनौका ‘इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम’ने सुसज्ज आहे. अत्याधुनिक टेक्नोलॉजी यात असून नीलगिरीला ब्लू वॉटर ऑपरेशनसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. 28 डिसेंबर 2017 रोजी या युद्धनौकेची बांधणी सुरु झाली. 28 सप्टेंबर 2019 ही युद्धनौका लॉन्च झाली.
आयएनएस नीलगिरीच्या समुद्री चाचण्या ऑगस्ट 2024 मध्ये सुरु झाल्या. सर्व चाचण्या या युद्धनौकेने यशस्वीरित्या पूर्ण केल्या. ही युद्धनौका 149 मीटर लांब आहे. यात रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी विशेष डिजाइनचा उपयोग करण्यात आला आहे. यात रॅपिड फायर क्लोज-इन वेपन सिस्टम आहेत.
आयएनएस वाघशीर
INS वाघशिर ही भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत बांधलेली सहावी आणि शेवटची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. हे विशेषत: गुप्त ऑपरेशन्ससाठी डिझाइन केले गेले आहे. जेणेकरून ते शत्रूच्या भागात कोणताही आवाज न करता आपली मोहीम पार पाडू शकेल. ही 67 मीटर लांब आणि 1,550 टन वजनाची पाणबुडी वायर-गाइडेड टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार यंत्रणांनी सुसज्ज आहे.
भविष्यात, त्यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञान जोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याची क्षमता आणखी वाढेल. शत्रुच्या प्रदेशात गुप्तपणे काम करण्यासाठी ही पाणबुडी डिझाइन करण्यात आली आहे.सबमरीनमध्ये वायर-गायडेड टॉरपीडो, एंटी-शिप मिसाइल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम आहे. या पाणबुडीमध्ये समुद्राच्यावर आणि पाण्याच्या खाली टार्गेट उद्धवस्त करण्यासाठी सक्षम आहे.
दरम्यान, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीय वाढेल. या युद्धनौका आणि पाणबुड्या केवळ भारताच्या सागरी हितांचे रक्षण करतील असे नाही तर जागतिक स्तरावर भारतीय नौदलाची प्रतिष्ठा आणखी मजबूत करतील.
हेही वाचा:
Baramati : फुटपाथवरून दुचाकी चालवाल तर….; बारामती पोलिसांचा बेशिस्त दुचाकीस्वारांना इशारा