ऍब्डॉमिनल ऍऑर्टिक एन्यूरिज़्मसाठी एंडोव्हॅस्कुलर स्टेंट ग्राफ्टिंग

गेल्या दोन दशकांत भारतात एब्डॉमिनल एऑर्टिक एन्यूरिज़्म (एएए) होण्याचे प्रमाण वाढले आहे. या व्याधीचे प्रमाण पुरुषांमध्ये (1.2 टक्के ते 8.1 टक्के) स्त्रियांच्या मानाने (0.02ींश 6.1 टक्के) जास्त असल्याचेही आढळले आहे. पुण्यातील व्हॅस्क्‍युलर सर्जनच्या मते ही व्याधी वयोमानानुसार होऊ शकते परंतु तंबाखू सेवन आणि धूम्रपान ही कारणेही तिला जबाबदार असल्यामुळे या बाबतीत जागृती होणे आवश्‍यक आहे. बहुतांश रुग्णांच्या बाबतीत एएए या समस्येची लक्षणे दिसून येत नाहीत.

मात्र सर्वसाधारणपणे पोटात, छातीत किंवा पाठीत कमी किंवा तीव्रतेने दुखणे ही लक्षणे आढळल्यास व्यक्ती एएएची रुग्ण आहे की नाही याची खात्री करावी लागते. या स्थितीचा उपचार करण्यासाठी एंडोव्हस्क्‍युलर स्टेंट ग्राफ्टिंग (ईव्हीएस) उपलब्ध आहे. या उपचारांत रुग्णाला रुग्णालयात अगदी अल्पकाळ राहावे लागते.

या प्रक्रियेत रक्तवाहिनी फुगलेल्या ठिकाणी अगदी छोटा छेद करून कृत्रिम नलिका बसवली जाते. धातूच्या फ्रेम भोवती कापड गुंडाळून तयार केलेली ही नलिका असते. काही रुग्णांच्या बाबतीत ही नलिका बसवण्याखेरीज फेमोरल आर्टरी बायपास ही प्रक्रियाही आवश्‍यक असते. ती करताना रुग्णाला संपूर्ण भूल दिली जाते आणि प्रक्रियेला तीन तास लागतात.

त्यानंतर सुमारे सहा आठवड्यात रुग्ण पूर्ण बरा होतो. आधी उल्लेख केलेल्या रुग्णाचे वय आणि शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेची जागा फक्त बधिर करण्याचा मार्ग आम्ही निवडला. या उपचारांनंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीतील बदल आणि फार श्रमाच्या हालचाली न करणे हे महत्त्वाचे असते.

प्रतिबंधाचे काही उपाय तंबाखू आणि तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन वर्ज्य करा. धूम्रपान बंद करा आणि इतरांनी धूम्रपान करून सोडलेला धूर श्‍वासावाटे शरीरात जाणार नाही याचीही काळजी घ्या. सकस अन्न खा. फळे, भाज्या, कडधान्ये, चिकन, मासे, कमी स्निग्धांश असलेली दूध आणि दुग्धजन्य उत्पादने यांचा आहारात समावेश करा.

स्निग्ध पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यावर नियंत्रण ठेवा. डॉक्‍टरांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घ्या. नियमित व्यायाम करा. आठवड्याला निदान 15 मिनिटे चालणे, पोहणे, धावणे यासारख्या श्‍वसनाचा वेग वाढवणाऱ्या व्यायामांवर वेळ खर्च करा. अर्थात व्यायामाची सवय नसेल तर तो हळूहळू वाढवा. तुम्हाला त्यातले कोणते व्यायाम झेपतील हे डॉक्‍टरांना विचारा मगच करा.

– डॉ शार्दुल दाते

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)