श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर शाहजहां याचाही समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीमेवर दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शोपिया जिल्ह्यातील गहंड परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार जवानांनी परिसराची घेराबंदी करत दहशतवाद्यांवर कारवाई केली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. माहितीनुसार, यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर शाहजहां याचाही समावेश आहे. दरम्यान या परिसरात अद्यापही शोधमोहीम चालू आहे.
Jammu and Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Shopian district. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xioVUQFXLH
— ANI (@ANI) April 13, 2019