मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
One terrorist neutralised in an encounter that broke out at Zolwa Kralpora Chadoora area of Budgam. Operation is underway, details awaited: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) January 7, 2022
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात गुरुवारी रात्री सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. चदूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी स्वत:ला वेढलेले पाहून जवानांवर गोळीबार सुरू केला. यास सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांना प्रथम एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले. त्यानंतर आणखी दोन दहशतवादी मारले गेले.
#UPDATE | Three terrorists neutralized in an encounter that broke out at the Zolwa Kralpora Chadoora area of Budgam. Identification & affiliation being ascertained. Incriminating materials including arms & ammunition recovered: IGP Kashmir pic.twitter.com/cNA303LTn3
— ANI (@ANI) January 7, 2022
काश्मीरचे आयजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. मारले गेलेले सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. आतापर्यंत एकाची ओळख श्रीनगर शहरातील वसीम अशी झाली आहे. घटनास्थळावरून तीन AK-56 रायफलसह दारुगोळा आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. चदूरा भागातील जलुवा गावात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. जवानांचा घेरा मजबूत होत असल्याचे पाहून लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी संयम बाळगत त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. मात्र ते मान्य झाले नाही आणि गोळीबार सुरूच ठेवला. अनेक संधी देऊनही जेव्हा दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले नाही तेव्हा जवानांच्या प्रत्युत्तराने चकमक सुरू झाली.
अंधारामुळे सुरक्षा दलाकडून संपूर्ण दक्षतेने कारवाई सुरू होती रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. चकमकीला दुजोरा देताना पोलिसांनी सांगितले की, अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.