लंडन – 12 व्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 105 धावांनी पराभव करत आपल्या विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली. याच सामन्यात गोलंदाज इम्रान ताहीर यांच्या नावे अनोखा विक्रम झाला आहे.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिलेच षटक फिरकीपटू इम्रान ताहीरला देत ड्यु प्लेसिसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ताहीरनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत, पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्याच बरोबर विश्वचषक स्पर्धेत पहिल षटक टाकणारा ताहीर हा पहिला फिरकीपटू ठरला आहे.