बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी याचं नाव ऐकलं की डोक्यात पहिल्यांदा काही येत असेल तर ते म्हणजे त्याचे किसिंग सीन्स! एकामागून एक आलेल्या चित्रपटात त्याने त्याच्या अपोझिट काम करणाऱ्या अभिनेत्रींना केलेल्या ऑनस्क्रीन ‘किसिंग’मुळे त्याला बॉलिवूडचा सिरीयल ‘किस’र अशी अनोखी ओळख मिळाली.
आज याच सिरीयल किसर इम्रान हाश्मीच्या ४५वा वाढदिवस. चला तर इम्रान बद्दल काही फॅक्टस जाणून घेऊयात ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील…
१. इम्रानने २००३मध्ये विक्रम भटच्या थ्रिलर पटातून बॉलिवूडमध्ये इंट्री केली. आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातच त्याने गॅंगस्टरचा रोल निभावला. पुढेही त्याने अनेक चित्रपटांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रोल साकारले. वन्स अपॉन ए टाईम इन मुंबईमधला शोएब असो अथवा जन्नत २ मधला सोनू दिल्ली के के सी प्रेक्षकांनी त्याच्या अशा रोल्सला देखील चांगलीच पसंती दिली.
२. अनेकांना माहिती नसेल पण इम्रान हाश्मी हा महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचा पुतण्या आहे. इम्रानची आजी मेहेरबानो मोहम्मद अली आणि महेश व मुकेश यांच्या आई शिरीन मोहम्मद अली या बहिणी होत्या. इम्रानचे शिक्षण मुंबईमध्येच झाले असून त्याला लहानपणापासूनच बॉलिवूडबाबत आकर्षण होते.
३. इम्रानने २००६ मध्ये परवीन शहाणी हिच्यासोबत लगीनगाठ बांधली. लग्नापूर्वी परवीन व इम्रान तब्बल ६.५ वर्ष एकमेकांना डेट करत होते. या क्युट कपलला एक मुलगा असून त्याच नाव आयान आहे.
४. इम्रानचा मुलगा आयान याला कॅन्सर असल्याचे निदान २०१४ मध्ये झाले होते. तो काळ इम्रान व त्याची पत्नी परवीन यांच्यासाठी खूपच अडचणीचा होता. २०१९ मध्ये आयान कॅन्सरमधून पूर्णपणे बरा झाला. अनेकांना याबाबत माहिती नाही मात्र इम्रानने त्याच्या मुलाच्या कॅन्सर लढ्याबाबत एक पुस्तक लिहले असून या पुस्तकाचे नाव ‘किस ऑफ लाईफ’ असे आहे.. बर्थ डे बॉय इम्रानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…