मुंबई -ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही निवड केली.
उषा मंगेशकर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी मां, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इनकार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली.