पुणे : पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे दि. १७ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत पुष्पोत्सव आयोजित करण्यात आले आहे. गार्डनमधील रंगीबेरंगी अशी लाखो फुले पाहून प्रत्येकाचेच मन फुलांप्रमाणे ताजेतवाने होऊन जात आहे.
यावर्षी पुष्पप्रदर्शनामध्ये शोभिवंत कुंड्या, विविध पानाफुलांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या जपानी पद्धतीच्या पुष्परचना, बोन्साय वृक्ष इ. पुष्प रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.
निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास, वाढती जंगलतोड, नामशेष होत चाललेल्या टेकड्या, लुप्त होत चाललेले नाले यावर प्रकाश टाकणाऱ्या पुष्प रचना साकारण्यात आल्या आहेत अशा या अतिशय मनमोहक पुष्पोत्सवाला प्रत्येकाने एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.