शहरात कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छतेसह जनजागृती

नव्या ठेकेदाराने आपली यंत्रणा कामास लावली असून प्रत्येक गाडीवर भोंगे बसवून त्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाच ओला कचरा, सुका कचरा यांचे वर्गीकरण कसे करावे याची माहितीही दिली जाते.  

 

नगर  – शहरात दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात थंडी तापाचे रुग्ण अनेकभागात दिसून येत आहेत. शहरात आणि उपनगरात गेले अनेक दिवसांपासून कचरा संकलन झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

नगर शहरात दरदोज साधारणतः 125 टन कचरा पडतो. मात्र त्यातील 100 टन कचराच उचलला जातो.उरलेला कचरा दुसऱ्या दिवशी प्राधान्याने संकलित केला जातो. त्यामुळे शहरात व उपनगरात ज्या ठिकाणी कचरा पडून राहतो त्याठिकाणी मोठी दुर्गंधी सुटते. त्यातून रोगराई पसरते आहे. तर अनेक ठिकाणी कचरा संकलन होत नसल्याने कचरा पेटवून दिला जातो.त्यामुळेही प्रदूषण होते. त्याचा परिपाक नागरिकांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जाण्यात होत असल्याने शहरातील अनेक रुग्णालयातून थंडी तापाचे रुग्ण दाखल होत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी जागोजागी बसविलेले कंटेनर कचऱ्याने ओसंडून वाहतांना दिसतात मात्र त्यातूनही कचरा वाहून नेला जात नाही, उपनगरात माऊली सभागृहासमोरील, तसेच शहरातील बालिकाश्रमरस्ता येथील कचराकुंड्या भरभरून वाहतांना दिसत आहेत.

शहरातील कारा संकलन समस्येला कंटाळून अखेर पुण्यातील खासगी ठेकेदाराला कचरा संकलनाचा ठेका दिला त्या ठेकेदाराने आपली यंत्रणाही नगर शहरात आणली असून 40 घंटागाड्या, 10 कंटेनर, 5 कॉंपॅक्‍टर यांचा समावेश असलेल्या या ठेकेदाराने आपले काम शनिवारी सुरू केले आहे मात्र शहरात इतका कचराच इतका साठला आहे की त्याचा निपटारा करताना नव्या ठेकेदाराच्या नाकी नऊ येणार आहे.
सध्या शहरातील कचरा संकलन करून सगळा कचरा सावेडी येथील कचरा डेपोत ताकण्यात येणार असून तेथून अतो कचरा प्रक्रियेसाठी सुपायेथे हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)