Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर- उपमुख्यमंत्री फडणवीस

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी सामंजस्य करार

by प्रभात वृत्तसेवा
June 6, 2023 | 7:46 pm
A A
ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर- उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  : राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच टोरंट पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान अनुक्रमे रू. ४४ हजार कोटी व रु. २७ हजार कोटी इतक्या रकमेचे सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कुमार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांव्दारे राज्यातील शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील विजेची वाढती मागणी भागवता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पांत हरित आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) राज्यात ७ हजार ३५० मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील सावित्री (२२५० मेगावॅट), काळू (११५० मेगावॅट), केंगाडी (१५५० मेगावॅट) व जालोंद (२४०० मेगावॅट) या ४ ठिकाणी ऑन स्ट्रिम (On-stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी ही ठिकाणे या कंपनीस वाटप केली आहेत.

मे. टोरंट पॉवर लि. कंपनी कर्जत (३००० MW), मावळ (१२०० MW), जुन्नर (१५०० MW) या तीन ठिकाणी एकूण ५७०० MW क्षमतेचे ऑफ स्ट्रिम (Off Stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसीत करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे रु. २७ हजार कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात १३,०५० मेगावॉट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार असून याव्दारे एकूण रुपये ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ग्रीड बॅलन्सिंग, पीक डिमांड पूर्ण करणे, ब्लॅक स्टार्ट इत्यादी बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी होईल. याव्दारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधीही वाढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उदंचन जलविद्युत प्रकल्प तंत्रज्ञान

उदंचन जलविद्युत प्रकल्प (Pumped Storage Projects) नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेजप्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे Lower Reservoir मधून Upper Reservoir मध्ये पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर हायड्रोइलेक्ट्रिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो. उदंचन जलविद्युत प्रकल्प हे गेल्या शतकभरामधील सिद्ध ठरलेले तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रदूषण जवळपास होत नाही, त्याचबरोबर केवळ अल्प साठवणूक क्षमतेच्या निम्न व ऊर्ध्व जलाशयामुळे मानवी वस्तीचे संपादन, पुनर्वसनचे प्रश्नही उद्भवत नाही. या तंत्रज्ञानालाच ‘नैसर्गिक बॅटरी’ असेही संबोधण्यात येते.

बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्ट‍िम दीर्घकाळ टिकाऊ ठरत नाही; तर, उदंचन संच प्रकल्प दीर्घकाळ टिकाऊ ठरतात. त्यामुळे उदंचन संच प्रकल्प जास्त व्यवहार्य ठरतो. देशात व महाराष्ट्रात ती क्षमता केवळ पश्चिम घाटाच्या परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचे मुख्य कारण पश्चिम घाटांमधील अनुकूल अशी सह्याद्रीच्या पर्वत रांगांची प्राकृतिक रचना होय.

Tags: Deputy Chief Minister Devendra Fadnavisempowerment of power sectorUdanchan hydropower projects
Previous Post

Alandi : इंद्रायणीतील जलप्रदुषण रोखण्यासाठीच्या उपायोजना कालबद्धरित्या पूर्ण कराव्यात- जिल्हाधिकारी देशमुख

Next Post

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार; विश्वस्त मंडळाचा निर्णय जाहीर

शिफारस केलेल्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला सहकुटुंब बाप्पाला निरोप ; ‘सागर’ निवासस्थानावरील गणपतीचे विसर्जन
Top News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला सहकुटुंब बाप्पाला निरोप ; ‘सागर’ निवासस्थानावरील गणपतीचे विसर्जन

12 hours ago
Nagpur Heavy Rain : नागपुरातील अनेक भागात पूरस्थिती; 400 हून अधिक जणांची सुटका… शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय
Top News

Nagpur Heavy Rain : नागपुरातील अनेक भागात पूरस्थिती; 400 हून अधिक जणांची सुटका… शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय

5 days ago
मी सत्तेत सहभागी झालो तर काय चुकले? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल
Top News

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

7 days ago
Ganeshotsav 2023 : विघ्नहर्त्याचा आशिर्वाद पुण्याला, महाराष्ट्राला लाभू दे – देवेंद्र फडणवीस
पुणे

Ganeshotsav 2023 : विघ्नहर्त्याचा आशिर्वाद पुण्याला, महाराष्ट्राला लाभू दे – देवेंद्र फडणवीस

1 week ago
Next Post
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार; विश्वस्त मंडळाचा निर्णय जाहीर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार; विश्वस्त मंडळाचा निर्णय जाहीर

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Deputy Chief Minister Devendra Fadnavisempowerment of power sectorUdanchan hydropower projects

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही