शेतीविषयक उपक्रमांना सहकार्य करण्यावर भर : सतेज पाटील

कोल्हापूर – हवामान बदलामुळे शेती उत्पादनात घट होत असल्याचे जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. या आव्हानाला सामोरे जात भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करुन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत, असे आवाहन करुन शेतकऱ्यांना व शेतीविषयक चांगल्या उपक्रमांना निश्‍चितच सहकार्य करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

कृषी सेवक, देशी- खत, कीटकनाशके वितरक अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषिसेवक, देशी -खत कीटकनाशके वितरक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच महिला शेतकरी दिनानिमित्त शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महिलांचाही पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.