मुंबई – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही उक्ती सार्थ ठरवत सचिन तेंडुलकरसह जगभरातील खेळाडूंनी मदर्स डे चे औचित्य साधून आणि मुख्य म्हणजे सोशल डिस्टंन्सिगचे पालन करुन आईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
तू माझ्यासाठी जे काही केलंस ते अन्य कोणीही करु शकत नाही. माझ्यासाठी श्वास आणि तू दोन्ही समानच आहे आणि या दोन्हीशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे, अशा शब्दात सचिनने आपल्या भावना व्यक्त करतानाच आईला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर सचिनने सोशल मीडियावर आपल्या बालपणीचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
You are AAI to me because, besides everything else you are Always Amazing & Irreplaceable.
Thank you for everything you have done for me. 🙏Happy #MothersDay Aai. pic.twitter.com/UVQeMMmRjX
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 10, 2020
सचिनसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, महंमद कैफ, रोहित शर्मा, हरभजनसिंग, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी देखील या दिवसाचे औचित्य साधून आपल्या आईप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बबिता फोगट, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ या खेळाडूंनीही हा दिवस साजरा करताना सर्वांना मदर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या. भारतातच नव्हे तर जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.