‘एमी अवार्ड्स २०१९’: ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ला नामांकन

मुंबई – प्रसिद्ध आतंराष्ट्रीय ‘एमी अवार्ड्स २०१९’ मध्ये नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’, लस्ट स्टोरीज आणि ‘द रिमिक्स’ या वेबसीरिजला विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. सेक्रेड गेम्सला ड्रामा सीरिजमध्ये एका श्रेणीमध्ये तर लस्ट स्टोरीजला दोन नामांकने मिळाली आहेत. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री राधिका आपटे हिला लस्ट स्टोरीजमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे. भारतीय वेब टेलीव्हिजन श्रेणीमध्ये ‘द रीमिक्स’ या वेबसीरिजला ‘इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ टेलीव्हिजन आर्ट्स अँड सायंन्सेस’ यांच्याकडून नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांमध्येमध्ये २१ देशांतील ४४ व्यक्तींचा समावेश आहे. २५ नोव्हेंबरला हिल्टन न्यूयॉर्क येथे विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.