टोक्यो – भारतासारख्या खंडप्राय देशाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत अवघ्या एका रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असताना ऑस्ट्रेलियन स्विमरच्या सात पदकांची चर्चा क्रीडाग्रामात जोरदार होताना दिसते आहे.
ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉन हिने टोक्यो ऑलिम्पिकमध्येधमाकेदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक-दोन नाही तर सात पदकं जिंकत रेकॉर्ड केला आहे. रविवारी मॅककॉनने महिलांच्या 4×बाय 100 मेडले रिलेमध्ये ऑस्ट्रेलिया संघासोबत जिंकत यंदाचं चौथं पदक मिळवलं.
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील 27 वर्षीय एम्मा मॅककॉनने एका ऑलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू बनली आहे. याआधी पुरुष जलतरणरटू माइकल फेल्प्सने अशी अप्रतिम कामगिरी केली आहे.
महिलांमध्ये मॅककॉनने 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 23.81 सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदक मिळवलं. त्याआधी 100 मीटर फ्रीस्टाइलमध्येही तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. मॅककॉनने चार गुणा 4×बाय 100 मेडले रिलेच्या संघातही ती सामिल होती. त्यातही तिने सुवर्णपदक मिळवलं. संपूर्ण ऑस्ट्रेलियन महिला संघाने शानदार प्रदर्शन केलं.
मॅककॉनने पहिल्या 50-फ्रीस्टाइलमध्ये विजयानंतर रिलेवरही बटरफ्लाय लेग केले. केट कॅंपबेलने फ्रीस्टाइलवर चांगल प्रदर्शन दाखवलं. संपूर्ण संघाने 3 मिनिटं 51.60 सेकंद ऑलिम्पिक रेकॉर्डला गवासणी घालत चॅम्पियन अमेरिकेला मागे टाकलं.
याआधी मॅककॉनने तिसरं टोक्यो ओलिम्पिक सुवर्ण पदक 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये जिंकलं होतं. मैककॉनने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर बटरफ्लाई, 4×200 मीटर रिले आणि 4 बाय 100 मीटर मिक्स्ड मेडले रिलेमध्ये अप्रतिम कामगिरी करत एकूण सात पदकं खिशात घातली आहेत.
अशी आहेत एम्माची सात पदकं…
1. गोल्ड – महिलांची 100 मीटर फ्री स्टाईल जलतरण
2. गोल्ड – महिलांची 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले जलतरण
3. गोल्ड – महिलांच्या 4 बाय 100 मीटर मेडले रिले जलतरण
4. गोल्ड – महिलांची 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण
5. गोल्ड – मिश्र 4 बाय 100 मीटर मेडले रिले जलतरण
6. ब्रॉंझ – महिलांची 100 मीटर बटरफ्लाय जलतरण
7. ब्रॉंझ – महिलांची 4200 मीटर फ्री स्टाईल रिले जलतरण