दिल्ली – रियाधवरून दिल्लीला येत असलेल्या “गो एअर’ विमानातील प्रवाशाल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे कराची येथे इमर्जन्सी लॅन्डिंग करावे लागले. या प्रवाशाचे नंतर निधन झाले. ही घटना मंगळवरी घडली. या विमानामध्ये 179 प्रवासी होते. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने “गो एअर’च्या जी8- 6658 य विमानाने जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याची परवनगी मागितली.
ही परवानगी मिळताच हे विमान जिना आंतररष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र संबंधित प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गो एअरचे विमान बुधवारी पहाटेच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरले आणि संबंधित प्रवाशाचा मृतदेहही दिल्लीला आणला गेला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे हे विमान वैद्यकीय कारणामुळे कराची विमानतळाकडे वळविण्यात आले असल्याचे “गो एयर’ कंपनीने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या प्रवाशाची दखल घेतली आणि कराची विमानतळावर उतरण्यापर्यंत त्याला कार्डिओपल्मोनरी रिसासिटेशन आणि ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर देण्यात आले होते. विमानतळावर तयारीत असलेल्या वैद्यकीय पथकानेही या प्रवाशावर उपचार केले.
मात्र त्यापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला होता, असे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रवाशाच्या नातेवाईकांसाठी आवश्यक ती मदत “गो एअर’च्यावतीने उपलब्ध करून दिली गेली, असे या निवेदनात म्हटले आहे.