बॅंकॉक – परंपरागत व्यवस्थेच्याविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान राजघराण्याच्या वाहनांच्या ताफ्याला धक्काबुक्की झाल्यानंतर थायलंडमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
थायलंडचे पंतप्रधन प्रयुथ चान ओचा यांच्या कार्यलयाबाहेर हजारो विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. पंतप्रधानांनी पायउतार व्हावे, घटनात्मक बदल आणि राजेशाहीमदह्ये सुधारणा करण्यात याव्यात या मागण्यांचा पाठपुरावा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होता.
काही विशिष्ट गट अनुचित घटना घडवून आणण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत आहेत. बॅंकॉकमध्ये काही अनुचित घटना अथवा राजघराण्याच्या वाहनांच्या ताफ्यला अडथळा आणण्याचा प्रयत्नही आंदोलकांकडून केला जाण्याची शक्यता असल्याने ही आणीबाणी आवश्यकच होती, असे पोलिसांनी म्हटले आहे.
बुधवारी राजवाड्याच्या परिसरामध्ये हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. लोकशाहीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी य् परिसरामध्ये तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन केले. 1973 साली झलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे स्मरण करण्यासाठी हे आंदोलन केले गेले. राजवंशाच्या पाठिराख्यांच्या आंदोलनाविरोधातील लष्कराने केलेल्या हुकुमशाहीला या आंदोलनाद्वारे आव्हान दिले गेले होते.
राजघराण्याच्या वाहनाच्या ताफ्याच्या दिशेने आंदोलनकर्ते पुढे सरकू लागल्याचे दिसल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास आणीबाणीची घोषणा करण्यात आली आणि पोलिसांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांना हुसकावून लावण्यस सुरुवात केली. विद्यार्थी आंदोलकांच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.
आपल्याला वकिलाचे सहाय्यही घेऊ दिले जात नसून बळजबरीने हेलिकॉप्टरमधून देशाच्या उत्तरेकडील एका शहरात नेले जात असल्याचे एका विद्यार्थ्याने फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले. एकूण 22 जणांना अटक केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.