मेक्‍सिकोमध्ये कोवॅक्‍सीन लसीला आपत्कालिन परवानगी

मेक्‍सिको सिटी – करोनाच्या प्रतिबंधासाठी भारतात उत्पादन केलेल्या कोवॅक्‍सीन या लसीच्या आपत्कालिन वापरासाठी मेक्‍सिकोमध्ये परवानगी देण्यात आली आहे. “द मेक्‍सिको फेडरल कमिशन फॉर प्रोटेक्‍शन अगेन्स्ट सॅनिटरी रिस्क’ ने कोवॅक्‍सीनच्या वापराला मंजूरी दिली आहे. मेक्‍सिकोतील कोविड-19 विरोधी लसीकरण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने कोवॅक्‍सीनला ही मंजूरी दिली गेली आहे.

लसीकरणाला सुरूवात केली असताना मेक्‍सिकोतील प्रशासनाने 96 लाख डोस वितरीत केले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्‍टरांना हे डोस दिले गेले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धातच या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले सध्या मेक्‍सिकोमध्ये पाच वेगवेगळ्या लस वापरल्या जात आहेत,

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, मेक्‍सिकोमध्ये करोना बाधितांची एकूण 22 लाख 56 हजार 509 प्रकरणे आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 204,985 लोक मरण पावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.