पारंपरिक भरतकामाची जगभरारी

– वर्षा शुक्‍ल

खेड्यातील मुली किंवा मुले गावंढळ असतात, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे काहीच कळत नाही, अशा शब्दांत आजही शहरी भागातील लोक त्यांची हेटाळणी करत असतात; परंतु ग्रामीण भागातील मुलांनी आजवर असंख्य क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केलेली आहे आणि ते वारंवार सिद्ध झाले आहे. उच्च पदावर किंवा क्रीडा मैदानावर बाजी मारणारी बहुतांशी मंडळींना ग्रामीण भागाचीच पार्श्‍वभूमी दिसून येते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे गावाबाहेर न पडलेल्या एका मुलीने आपल्या कलेच्या जोरावर अमेरिकेत प्रदर्शन भरवले. बिहारसारख्या मागासलेल्या राज्यातील खेड्यातील एक मुलगी जी कधीही गावाबाहेर गेली नाही, हॉस्टेलवर राहिली नाही एवढेच नाही तर इंग्रजीही बोलली नाही, अशा मुलीने थेट अमेरिका स्वारी केली आणि तेही वयाच्या चौदाव्या वर्षी. पालकांच्या पाठबळामुळे आणि जिद्दीच्या जोरावर तिने आपली भरतकामाची कला सातासमुद्रापार केली. अर्चना कुमारी असे या तरुणीचे नाव आहे.

अर्चना आजघडीला सामान्य गृहिणीप्रमाणे जीवन व्यतीत करत असून तिला पाच मुले आहेत. तिचे शिक्षण रामनगर येथील स्थानिक सरकारी शाळेत झाले; परंतु ती पारंपरिक भरतकाम, विणकामात निष्णात होती. हे काम आदिती स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्तीच्या लक्षात आले. या संस्थेबरोबर काम करताना अर्चनाकुमारी अमेरिकेच्या एनजीओच्या संपर्कात आली. ही संस्था याच भागात काम आणि संशोधन करत होती. त्यामुळे अमेरिकेत आशिया सोसायटीच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी अर्चनाकुमारीची निवड केली. यादरम्यान दस्ताकारचे संस्थापक लैला तय्यबजी आणि त्यांचे पथक भुसारा गावात सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने आले होते. रामनगरपासून भुसारा गाव जवळ होते. या मंडळींनी अर्चनाकुमारीचे भरतकाम दिल्ली दरबारी नेले. तोपर्यंत अर्चनाकुमारीला तय्यबजीच्या कामांची ओळख झाली होती. तय्यबजी यांच्यासमवेत काम करत असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली.
गावाबाहेर हा तिचा दुसरा प्रवास होता. त्याअगोदर ती कोलकत्याला पासपोर्टसाठी गेली होती. तिने अमेरिकेला एकटीने प्रवास केला. काही आठवडे तिने न्युयॉर्कमध्ये वास्तव्य केले. एवढ्या मोठ्या लोकांसमोर उभे राहण्याची मिळालेली संधी हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, असे अर्चनाकुमारी म्हणते. तिला श्रीलंकेतील भरतकाम स्पर्धेचे पहिले बक्षीसही मिळाले.
अमेरिकेत जाण्याचा योग तिच्यासाठी सुखद अनुभव ठरला. अमेरिकेतून परतल्यानंतर अर्चनाकुमारीने आपला नियमित अभ्यास सुरू केला. याकाळात तिने अनेक स्वयंसेवी संस्थांसमवेत काम केले. अदिती स्वयंसेवी संस्थेचे श्रीनिवासन यांच्या मदतीने तीने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले.
भरतकाम आणि विणकामाचे कौशल्य अवगत असले तरी त्याचे शास्त्रीय शिक्षण घ्यावे, प्रशिक्षण घ्यावे अशी तिला इच्छा होती. त्यासाठी तिने दिल्लीच्या एनआयएफटी संस्थेत प्रवेश घेतला आणि त्यासाठी पालकांची परवानगी मागितली. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला नोकरी मिळाली. कालांतराने नोकरी सोडून तिने स्वत:ची औनाम नावाची कंपनी सुरू केली. या माध्यमातून तिने अनेक प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रत्येक महिन्याला ती गावाला भेट देत असे आणि गावकऱ्यांशी संवाद साधून आपले नाते कायम ठेवले होते. तिने गावातील दोनशे मुलींचा गट तयार केला आणि त्यांना भरतकामाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय चाळीस ते पंचेचाळीस मुली नियमितपणे तिच्यासमवेत काम करतात. अर्चनाकुमारी आता दिल्लीत असून ती एका कंपनीची मालक आहे.
 आपल्या गावातील रामनगर येथील अनेक मुलांना याठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भरतकामाची नियमित विक्री होतेच असे नाही; परंतु तिने करिअर करताना आपल्या कलेला तिलांजली दिली नाही, हे विशेष. उलट त्या कलेला जगभरात पोचवण्याचे काम केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)