मुंबई -एम्बेसी ऑफिस पार्क या कंपनीच्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ज्वर युनिटस् सोमवारी शेअर बाजारावर नोंद झाल्यानंतर या शेअरच्या भावात पाच टक्क्यांनी वाढ झाली. हा शेअर तीनशे रुपयांना जारी करण्यात आला होता. मुंबई शेअरबाजारावर सोमवारी या शेअरच्या किमती 314 रुपये झाल्या होत्या.
सकाळी या किमती 324 रुपयांपर्यंत गेल्या. या कंपनीचे भांडवली मूल्य 24238 कोटी रुपये झाले आहे. आरईआयटी म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या आयपीओला 2.57 टक्क्यांनी जास्त प्रतिसाद मिळाला होता. यातून कंपनीला 4750 कोटी रुपये उभे करता आले. या उपक्रमांतर्गत 30 दशलक्ष वर्ग फुट बांधकाम उपलब्ध असून ही जागा किरायाने दिली जाणार आहे. यातील उत्पन्नात भागधारकांचा सहभाग असणार आहे. यामुळे या क्षेत्रात रिटेल गुंतवणूकदारांना उतरता येणार असल्याचे नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले.
व्यावसायिक जागेची मागणी भारतात वाढत जाणार आहे. याबाबत समाधान व्यक्त करताना पॅराडाइम रिऍल्टीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ मेहता म्हणाले की, या घडामोडींमुळे या क्षेत्रात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. ईकेटीए वर्ल्ड या कंपनीचे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी सांगितले की, या इश्यूला मुळातच अधिक प्रतिसाद मिळाला होता.आता नोंदणीनंतरही भावात वाढ झाली आहे ही आनंदाची बाब आहे. साई इस्टेट कन्सल्टंटचे संस्थापक अमित वाधवानी यांनी सांगितले की, आगामी काळात इतर काही रिल्टी क्षेत्रातील कंपन्या असा प्रयोग करू शकतील