चेन्नई – चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य केल्याने मोठी खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त अस की,अर्वाकुरची येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना अभिनेता कमल हसन यांनी, “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू दहशतवादी आहे.” असं वक्तव्य केलं आहे.
अर्वाकुरची इथं येत्या रविवारी पोटनिवडणूक होणार असून याच पार्श्वभूमीवर प्रचारसभेत कमल हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत असून काही लोकांच्या मते हसन यांनी केलेलं वक्तव्य बरोबरंच आहे, तर काहींनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान नथुराम गोडसे याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या महात्मा गांधी यांची हत्या केली असल्याने त्याच्यावर याआधी देखील अनेकांद्वारे अशाप्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.