पेमा खांडू 29 मे रोजी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार- किरण रिजीजू

ईटानगर – अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पेमा खांडू यांची भाजपच्या विधानसभा नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता पेमा खांडू 29 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. किरण रिजीजू हे अरूणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अरूणाचल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. भाजपने 60 पैकी 41 ठिकाणी विजय मिळविला आहे तर एनपीपीला केवळ 5 ठिकाणी विजय मिळविता आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.