न्यूयॉर्क – आधुनिक विज्ञानांतील चमत्कार मानला गेलेला बहुचर्चित संशोधक इलॉन मस्क याने आणखी एका महत्वाच्या शोधाला गवसणी घातली आहे त्याने आता एक चिप विकसित केली आहे जी मानवाच्या मेंदूत बसवली कि अनेक आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
या चमत्कारी चिपच्या माध्यमातून आंधळेपणा किंवा ऐकू कमी येणं किंवा मेमरी लॉस आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमधे ठेवता येणार आहे मानवी शरिरातल्या गोष्टी ह्या चिपद्वारे साध्य करण्याचा इलॉनचा मानस आहे.
इलॉनने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपल्या या यशस्वी प्रयोगाची माहिती जाहीर केली चार डुकरांवर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याने या प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर केले गर्ट्रुड नावाच्या डुकराच्या मेंदूत हि चिप बसवण्यात अली होती.
हि चिप रोबोचा वापर करून कधीही काढता आणि घालता येते या प्रयोगानंतर आता मानवी मेंदूमध्ये अशा प्रकारची चिप बसवण्यास तो उत्सुक आहे त्यासाठी त्याने परवानगी मागितली आहे गेल्या वर्षी माकडांवरील प्रयोगही यशस्वी झाला होता या चिपच्या माध्यमातून संगणक किंवा मोबाईल नियंत्रित केला जावा असा त्याचा मूळ उद्देश होता पण आता मेंदूशी संबंधित किंवा मानवी शरीरातील विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकेल असा त्याला विश्वास आहे
अशा प्रकारच्या उपयुक्त शोधांमुळेच इलॉन मस्क आधुनिक काळातील एक चमत्कार मानला जातो त्याने आत्ता पर्यंत अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा गोष्टी सत्यात उतरवल्या आहेत उदाहरणार्थ विजेवर चालणारी टेस्ला हि कार कंपनी सध्या जगात धुमाकुळ घालत आहे त्यामागे इलॉनचेच डोके आहे.
त्याचा दुसरा महत्वाचा शोध म्हणजे हायपर लूप तंत्रज्ञान या तंत्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करून 300 किलोमीटरचा प्रवास फक्त एका तासात पुर्ण होइल .भविष्यात पुणे -मुंबई या मार्गावर हायपरलूपची चाचणी करण्यात येणार आहे. तेव्हा या दोन शहरातील अंतर फक्त तासाभरात कापले जाणार आहे.
स्पेसेक्स हिइलॉन मस्कची खाजगी अंतराळ कंपनी आहे जी सध्या अनेक रॉकेट अंतराळात पाठवत आहेत भविष्यात मंगळावर मानवी वसाहत उभायण्याचे ध्येय इलॉनने बाळगले आहे